logo

शालेय विद्यार्थ्यांसाठी आगरदांडा एस टी सेवा सुरू करा : साकिब गजगे यांची मागणी *मुरुड आगारप्रमुख यांना दिले निवेदन*

शालेय विद्यार्थ्यांसाठी आगरदांडा एस टी सेवा सुरू करा : साकिब गजगे यांची मागणी
*मुरुड आगारप्रमुख यांना दिले निवेदन*
ता.२२ मुरुड तालुक्यातील आगरदांडा परीसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या वेळेत आगरदांडा -मुरुड एस टी सेवा सुरू करण्यात यावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते साकिब गजगे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुरुड आगारप्रमुख वाकचौरे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आगरदांडा, खारआंबोली, शिघ्रे येथील अनेक विदयार्थी अंजूमन हायस्कूल, ज्यु. कॉलेज व डिग्री कॉलेज येथे शिक्षण घेण्यासाठी नियमीत प्रवास करीत आहेत. आपल्या आगारातून सदर विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार एस. टी. पास सवलत दिलेली आहे. तरी अंजूमन इस्लाम जंजिरा मुरुड आपले जवळ आगरदांडा वरुन सकाळी ७.४५ वाजता आगरदांडा - मुरुड व दुपारी १४.०० वाजता मुरुड आगरदांडा अशी एस. टी. बसची मागणी दि. ६/०८/२०२२ रोजीच्या पत्रान्वये अंजुमन इस्लाम संस्थेचे सचिव अब्ब्ल रहीम कबले यांनी केली होती. परंतू या पत्रावर आज दिड महीना होऊनही कोणती कार्यवाही करण्यांत आलेली दिसून येत नाही.
मुरुड आगरातून तळा कॉलेजला जाण्यासाठी सकाळी मुरुड तळा बस सकाळी ६.१५ वाजता सुरु करण्यांत आली आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी मुरुड तळा दुसरी फेरी मुरुडहून १०.१५ वाजता सुरु करण्यांत आली. तसेच सर. एस. एस. हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी ११.०० वाजता नांदले मुरुड ही फेरी सुरु करण्यांत आलेली आहे. विदयार्थ्यांचे नुकसान न होणेकामी आपण सुरु केलेल्या या एस.टी. सेवांबद्दल मी आपले अत्यंत आभार मानतो. परंतू अंजूमन इस्लाम मुरुड जंजिरा येथे शिकणाऱ्या विदयार्थ्यांसाठी संस्थेचे पत्र देवूनसुध्दा आणि वारंवार तोंडी चर्चा करुन सुध्दा आपण आजतागायत विद्यार्थ्यांसाठी कोणतीही फेरी चालू केलेली नाही . विद्यार्थ्यांनी पासाचे पैसे भरुन त्यांना शाळा, कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत एस.टी. बस नसल्यामुळे नाईलाजास्तव खाजगी गाडीचे पैसे भरुन प्रवास करावा लागतो.
तरी आठ दिवसांत सकाळी आगदांडा मुरुड ७.४५ वाजता व दुपारी मुरुड आगरदांडा २.०० वाजता एस.टी. सेवा सुरु न केल्यास शैक्षणिक सत्र सुरु झाल्यापासून विदयार्थ्यांनी आपलेकडून पैसे भरुन काढलेल्या पासाचे पैसे, (विदयार्थ्यांना एस.टी.बस सेवा) न मिळाल्यामुळे परत मिळविण्याकरीता मला आपले विरोधात कन्झुमर कोर्टात दावा करावा लागेल. याची नोंद घ्यावी. त्याकामी होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी आपणांवर राहील.असे साकिब गजगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले असून सदर निवेदनाच्या प्रती मुरुड तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या आहेत.
________________________________________

9
17172 views